Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

अतिवृष्टीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने बचाव व मदत कार्य

Seva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुरसदृश्य परिस्थितीत अडलेल्या एक हजार १३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

marathinews24.com

पुणे – मावळ तालुक्यात दि. ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पूरसदृश्य परिस्थिती, रस्ते बंद होणे, घरांची पडझड, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणे, पशुधन व पिकांचे नुकसान तसेच नागरिक व पर्यटक अडकण्याच्या घटना घडल्या. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवून विविध ठिकाणी अडकलेल्या एक हजार १३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले. दुर्दैवाने पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार अनुज्ञेय आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार – सविस्तर बातमी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पीएमआरडीए, लोणावळा व वडगाव नगरपरिषद, पोलीस, आपदा मित्र, वन्यजीव रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्रभावी बचाव व मदतकार्य केले.

भूस्खलनामुळे बाधित क्षेत्र
मावळ तालुक्यातील मौजे पाटण येथे दि. ६ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून एक घर पूर्णपणे नष्ट झाले. मौजे खंडाळा येथील रस्टिक हायलँड सोसायटीमधील नॉर्थ पॉईंट हॉटेलमध्ये अडकलेल्या १४ पर्यटक व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या परिसरातील आठ ते दहा बंगल्यांमध्ये माती व दगडांचा मोठ्या प्रमाणात मलबा शिरला असून येथे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

मौजे ताजे येथे सतर्कतेचा इशारा देऊन ५६ कुटुंबांतील ३०५ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा व सज्जनवाडी येथील अंगणवाडीत उभारलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. मौजे भाजे येथील संपर्क शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले.

दुधीवरे खिंड, तुंग-जवन रस्ता, आपटी, डाहुली, बऊर खिंड, चावसर घाट, कोळे-चाफेसर रस्ता तसेच तुंगार्ली-पांगळोली मार्गावर भूस्खलनामुळे माती व दगडांचा मलबा आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बलयन येथील स्मशानभूमीही मलब्याखाली गेली.

पुरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या एक हजार १३७ नागरिकांचे स्थलांतर
मौजे निगडे येथील गार ओढ्यात एक नागरिक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. भांगरवाडी (लोणावळा) येथील हुडको सोसायटीतील सुमारे ५१० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून नगरपरिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. मळवली येथील समर कॅसल परिसर, डेल्टीन एस्केप व्हिला, इशांत फार्म व इतर बंगल्यांमध्ये अडकलेल्या ९७ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

पवनानगर बाजारपेठ, कामशेत, वळवण येथील डेनकर कॉलनी व कालेकर वस्ती, साळुंब्रे येथील नदीकाठची घरे, डोंगरगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी तसेच सांगवडे, गहुंजे व लोढा सोसायटी परिसरात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. डोंगरगाव व वळवण येथील ५०, साळुंब्रे येथील ३५, सांगवडे येथील २०, गहुंजे येथील ४०, ताजे येथील ३०५, भाजे येथील ३० आणि मळवली येथील ९७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

नुकसान पंचनाम्याची कार्यवाही सुरू
अतिवृष्टीमुळे सोमाटणे, कुसवली व करंडोली येथे घरांची पडझड झाली असून भात रोपे व भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, शेती व इतर मालमत्तेच्या नुकसानीचेही सर्वेक्षण करून शासन नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×