सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार प्रदान
marathinews24.com
पुणे – स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार मला मिळाला, तेही प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, हे माझ्यासाठी रोमांचित करणारे आहे. हा खरच आनंदाचा क्षण आहे. अशी प्रतिक्रिया जेष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी दिली आहे.प्रियंकाजी महिला उदयोग व वसंत दादा सेवा संस्था आयोजित नृत्य स्पर्धा २०२५ बक्षीस वितरण समारंभ आणि स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी आयोजित केला होता.
डिएपी खताऐवजी पर्यायी खते वापरण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे उपस्थित होते.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, सतत सातत्याने नवनवीन करण्याचा प्रयत्न करा. आता आम्ही अशा काळात आहोत, की स्व. राजीव गांधी यांच्या काळात तंत्रज्ञानमध्ये मोठी झेप घेतली होती. दरम्यान, लेखक नावाचा माणुस आता शिल्लक राहिल का नाही, कारण कलेला तंत्रज्ञानाने मोडीत काढले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
गावाकडून पुण्यात आलो, आर्थिक गरज असल्यामुळे नोकरी केली. मात्र, नोकरीत जाचक वाटत होते. दरम्यान, पुणे सांस्कृतिक राहण्यासाठी आपण ते टिकवून ठेवत आहोत. आजूबाजूला सांस्कृतिक वातावरण चांगले होते, तेच टिकवण्यासाठी आपण प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
प्रा. सतीश आळेकर म्हणाले, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचा अभिनय उत्तम करतात. देऊळ आणि गाभरीचा पाऊस या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. ग्रामीण भागातील राजकारण, संवेदना त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. यापुढेही त्यांनी चित्रपट निर्माण करावेत, अशी इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या संयोजिका संजीवनी बालगुडे यांनी आभार मानले.