मंत्रीचंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य भोवले
marathinews24.com
पुणे – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी रीलस्टार संतोष पंडीत याला अटक करण्यात आली. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तहसील कार्यालयात लाच घेणाऱ्या दलालाला पकडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या समाज माध्यमातील खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत नुकतीच प्रसारित केले. ‘ जनतेच्या प्रश्नाची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत’, असा मजकूर असलेली चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली.
चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक पांडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. अश्लील, शिवराळ भाषा आहे. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते.
भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये पंडीत याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंडीत याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.





















