Breking News
वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत वारकऱ्यांनां लाभपरीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ४० लाखाची लाचराजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनाखरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्रीपालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळ्या जेरबंदसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनपुण्यात पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्याश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज – मुख्याधिकारी बालाजी लोंढेCrime News : मोबाइल हरवला अन पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

रिलायन्स जिओ कंपनीचे १२ लाख ५० हजांराचे साहित्य चोरीला

बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील घटना

Marathinews24.com

पुणे – रिलायन्स जिओ कंपनीची १२ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना जानेवारी ते डिसेंबर २०२२ कालावधीत बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील ममता चौकात घडली आहे. संबंधित कामाचे लेखे तपासले असता, चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार उपठेकेदार महिलेने याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायबर इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीकडून काम केले जाते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ कालावधीत बालेवाडीतील ममता चौकात काम सुरू होते. त्यावेळेस चोरट्यांनी कंपनीचे तब्बल १२ लाख ४४ लाखांचे साहित्य चोरून नेले. कामादरम्यान याची माहिती सुरक्षारक्षकांसह कोणालाही मिळाली नाही. मात्र, संबंधित प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर लेखे परिक्षणादरम्यान साहित्य नसल्याचे दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर उप ठेकेदार महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक रहिगुडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top