Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाकडील रोकड चोरली; रिक्षा चालक अटकेत

पसार झालेल्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने केली अटक

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाण्याने रोकड चोरुन पसार झालेल्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून २४ हजारांची रोकड आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा असा एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इद्रीस शफीक शेख (वय ३६, सध्या रा. बावधन, मूळ रा. तुखमापूर, बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

विनयभंग प्रकरणी आरोपीला १० वर्षांनंतर कारावासाची शिक्षा – सविस्तर बातमी

मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात ११ फेब्रुवारी रोजी परगावाहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा रिक्षा चालक शेख आणि साथीदारांनी केला. ज्येष्ठाला सोडण्याचा बहाणा करुन त्याच्याकडील असलेल्या पिशवीतून ३० हजारांची रोकड चोरुन शेख आणि साथीदार पसार झाले होते. या प्रकरणी अनोळखी रिक्षा चालक आणि साथीदाराविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून समांतर तपास करण्यात येत होता. पोलीस कर्मचारी सुभाष आव्हाड आणि किशोर दुशिंग यांना पसार झालेला रिक्षा चालक शेख याची माहिती मिळाली.

त्यानंतर वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने ज्येष्ठाला मदत करण्याचा बहाणा करुन रोकड चोरल्याची कबुली दिली. शेख याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, हरीष मोरे, एकनाथ जोशी, सुभाष आव्हाड, प्रवीण भालचिम, अमजद शेख, विठ्ठल वाव्हळ, मयूरी नलावडे, रोहिणी पांढरकर यांनी ही कारवाई केली.

दरोडा प्रकरणातील पसार चोरटा गजाआड

दरोडा प्रकरण, तसेच शस्त्र बाळगल्या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. महादेव श्रीरंग झाडे (वय २१, रा. अतुलनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. झाडे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. झाडे याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, साधना पवार, रेहाना शेख, महेश पाटील यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×