Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

लिफ्ट देण्याच्या बतावणीने लुटणारे गजाआड

लिफ्ट देण्याच्या बतावणीने लुटणारे गजाआड

गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

marathinews24.com

पुणे – मोटारीतून पुणे स्टेशनला सोडण्याची बतावणी करुन तरुणाला लुटून पसार झालेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून मोबाइल, मोटार असा मुद्देमाल जप्त केला. राहुल किसन सावंत (वय १९, सध्या रा. समर्थनगर, खराडी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड), निशांत झुंबर बागुल (वय २१, रा. चिखलटाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), महेश रामकिसन सोनटक्के (वय २०, रा. खांदवेनगर, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरोड्यातील गुन्ह्यात फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी 

तक्रारदार तरुण नगर रस्ता परिसरात पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी आरोपी सावंत, बागुल, सोनटक्के यांनी बतावणी केली. तरुणाला मोटारीतून सोडण्याचा बहाणा करुन वाटेत त्याला मारहाण केली. त्याच्याकडील रोकड, मोबाइल असा मुद्देमाल लुटून तिघे जण पसार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पसार झालेल्या चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून माग काढण्यात येत होता. तरुणाला लुटणारे आरोपी खराडी भागातील उपाहारगृहात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून तिघांना पकडले. चोरट्यांकडून चोरलेला मोबाइल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक फौजदार हरीष मोरे, एकनाथ जोशी, प्रवीण भालचिम यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×