सेल्स मॅनेजरकडून कंपनीला ७.३५ लाख रुपयांचा गंडा

सेल्स मॅनेजरकडून फसवणूक; कंपनीला ७.३५ लाखांचा तोटा, पुण्यातील कंपनीने दाखल केली एफआयआर

Marathinews24.com

पुणे – होमिओपॅथिक औषध कंपनीसोबत 7 लाख 35 हजार 702 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात कंपनीच्या माजी क्षेत्रीय सेल्स मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने बिहारमधील औषध वितरणादरम्यान ग्राहकांकडून पैसे घेतले, मात्र ते कंपनीला न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 406 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

‘डोल ओसिस होलिस्टिक मेडिसिन अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये कार्यरत असलेल्या मार्केटिंग मॅनेजर संदीप संपतराव कनसे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी अनुपकुमार सहाय याला 1 मार्च 2021 ते 21 ऑगस्ट 2023 दरम्यान गया, बिहार या भागात कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी दिली होती. डॉक्टर व डीलरकडून औषधांचे ऑर्डर घेऊन ते पुणे मुख्यालयाकडे पाठवने हे त्याचे काम होते. मुख्यालयाकडून औषधे पाठवल्यानंतर आरोपीने संबंधित ग्राहकांकडून पैसे गोळा करून ते कंपनीकडे जमा करायचे होते.
सुरुवातीला आरोपीने जबाबदारी पार पाडली, पण नंतर त्याने ग्राहकांकडून पैसे घेत स्वतःकडे ठेवण्यास सुरुवात केली.आरोपीने किमान आठ डीलर व डॉक्टरांच्या नावाने औषधं मागवली आणि काहींना अपूर्ण डिलिव्हरी दिली, तर काहींना पूर्ण पैसे घेऊनही कंपनीला माहिती दिली नाही. संबंधित ऑर्डर्समधूनही कंपनीला पैसे न देता आरोपीने स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले.
कंपनीला ही फसवणूक अंतर्गत ऑडिटदरम्यान लक्षात आली. ऑर्डर व पेमेंटमध्ये विसंगती आढळल्यावर कंपनीने आरोपीकडे खुलासा मागवला, पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल केली. कोरेगाव पार्क पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top