Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चंदन चोरी

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चंदन चोरी

चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाची झाड कापून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आलाी. याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आगाखान पॅलेसमधील उद्यान सहायक ओंकार गरुड (वय ४०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कनमध्ये मोटारीतून दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील आगाखान पॅलेसच्या आवारात कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालय आहे. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटे आगाखान पॅलेसच्या आवारात शिरले. चोरट्यांनी कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड कापले. चंदनाच्या झाडाचा बुंधा करवतीने कापण्यात आला. बुंधा चोरून चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक जऱ्हाड तपास करत आहेत. पोलिसांनी आगाखान पॅलेसच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×