Breking News
बळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट

पूनावाला स्टड फार्ममध्ये चंदन चोरी

सहकारनगर भागातील बंगल्यात चंदनाची चोरी

रखवालदाराला मारहाण करुन झाडे कापून नेले

marathinews24.com

पुणे – पूनावाला स्टड फार्ममध्ये शिरलेल्या चाेरट्यांनी रखवालदारांना मारहाण करुन चंदनाची चार झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत परमेश्वर हिरामण कोळी (वय ४०, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचा जीएसटी विभागातील अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर थेऊर परिसरात पूनावाला स्टड फार्म आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री चार चोरटे पूनावाला स्टड फार्मच्या भिंतीवरुन उड्या मारुन शिरले. स्टड फार्ममधील रखवालदार कुंदन शर्मा, सरजित सिंग, इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शास्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

शहर परिसरात वर्षभरापासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी बंगले, सोसायटी, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×