Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सोसायटीमधील ७ दुचाकी पेटविणारा सराइत अटकेत

सोसायटीमधील ७ दुचाकी पेटविणारा सराइत अटकेत

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती फिर्याद

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारातील ७ दुचाकी पेटवून देऊन पसार झालेल्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धेश नितीन धुमाळ (वय २३, रा. घोरपडी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

व्यावसायिकाला मारहाण करणारे अटकेत – सविस्तर बातमी 

सिद्धेश हा सराइत गुन्हेगार आहे. त्याचा मित्र नऱ्हे भागातील सिद्धेश्वर प्लाझा या इमारतीत राहायला आहे. मित्र आणि तो बाहेर गेले होते. मंगळवारी रात्री सिद्धार्थने मित्राला घरी सोडण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सिद्धेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार मध्यरात्री सोसायटीत आले. त्यांनी तळमजल्यावरील मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिली.

शेजारी असलेल्या ६ दुचाकींनी पेट घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनने आरोपी सिद्धेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पंढरीनाथ शिंदे, अतुल साठे, अमित बोडरे, कैलास लिम्हण, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौंदर, चेतन शिरोळकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top