Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या; केज तालुक्यातील तांबव्यातील घटना

शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या; केज तालुक्यातील तांबव्यातील घटना

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; चर्चेला उधाण

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – केज तालुक्यातील तांबवा येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

शेळी-बोकड चोरी करणाऱ्या टोळीला अटक; ५ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव तनुजा गोविंद चाटे (वय १५, रा. तांबवा) असे आहे. ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी गावातील काही टवाळखोरांनी तिची छेड काढली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी केज पोलीस ठाण्यात गावातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे परिसरात घटनेने चर्चेला उधाण आले आहे . टवाळखोरांच्या छेडछाडीच्या प्रकरणामुळे तर हे टोकाचे पाऊल उचलले नाही? असा सवाल गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तनुजाच्या जाण्याने चाटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे पार्थिव विच्छेदनासाठी केज येथील स्वामी रामानंद तीर्थ उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. तिच्या पार्थिवावर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×