वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना काळाचा घाला
marathinews24.com
पुणे – शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर मंगळवारी दुपारी भरधाव वाहनाने दोन शाळकरी मुलींना धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली आहे.
पुण्यात नशाखोरांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला – सविस्तर बातमी
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहिती नुसार, मुली आपल्या वडिलां सोबत वाहनावरून जात असताना एका आयशर वाहनाने त्यांना धडक दिली. ही घटना दुपारी सुमारे 1 वाजता कात्रज- कोंढवा रस्त्यावरील कपिलामृत डेअरीजवळ घडली. गंभीर जखमी मुलीवर उपचार सुरू असून, अपघात आणि पुढील पोलिस कारवाईबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.






















