Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्तात वाढ

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू

marathinews24.com

पुणे – पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 18 फेब्रुवारी 2026 रोजी 00.01 पासून ते 3 मार्च 2026 रोजी 24 वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

इस्रो भेटीद्वारे विद्यार्थ्यांच्या अंतराळ विज्ञान ज्ञानात भर; वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यास मदत-मंत्री अतुल सावे – सविस्तर बातमी 

कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे. ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम 37(1) व (3) विरुध्द वर्तन करणे. कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणेस बंदी घालण्यात येत आहे.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे व त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×