Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा पाहणी

अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्याकडून अतिदक्षता विभागांची पाहणी; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

marathinews24.com

बारामती – अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच्या दुर्घटनेत बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी रुग्णालयातील विविध अतिदक्षता विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.

एसआयआरअंतर्गत दावे-हरकतींच्या सुनावणी प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण – सविस्तर बातमी

महाविद्यालयाच्या अति दक्षता विभागात कार्यरत असलेल्या व्हेंटिलेटर, मॉनिटर, ऑक्सिजन प्रणाली तसेच इतर जीवनरक्षक उपकरणांची कार्यस्थिती तपासण्यात आली. विद्युत यंत्रणा व फायर सेफ्टीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

अतिदक्षता विभागातील जीवनरक्षक उपकरणे चोवीस तास कार्यरत असल्याने विद्युत जोडणी, वायरिंग, अर्थिंग, आपत्कालीन वीजपुरवठा तसेच उपकरणांवरील विद्युत भार यांची सुरक्षितता तपासण्यावर भर द्यावा असे सांगून रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा, फायर एक्स्टिंग्विशर, अलार्म व्यवस्था आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यांचाही आढावा घेतला.

उपकरणांची नियमित तपासणी आवश्यक

जीवनरक्षक उपकरणांमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी राहू नये यासाठी नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक देखभाल करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. कोणत्याही उपकरणात अथवा विद्युत व्यवस्थेत संभाव्य धोका आढळल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अमरावतीतील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, विशेषतः अतिदक्षता विभागातील नवजात व बालरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व जीवनरक्षक सुविधा सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्यासाठी नियमित पाहणी करण्यात येत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×