शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
marathinews24.com
पुणे – जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
सराफाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस हवालदार निलंबित – सविस्तर बातमी
यावेळी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, उप विभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, डॉ. नारळीकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी डॉ. नारळीकर यांचे पार्थिव आयुका येथून वैकुंठ स्माशनभूमी येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.