Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात ज्येष्ठाची २२ कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरटे गजाआड

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात सायबर चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगर, तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटक – सविस्तर बातमी 

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे मूळचे हरयाणाील आहे. पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना रक्कम मिळाली होती. ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. त्यानंतर त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या सात बँक खात्यात वेळोवेळी २२ कोटी तीन लाख रुपये जमा केले.

रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना छत्रपती संभाजीनगर, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, संगीता देवकाते, उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशील डमरे, हवालदार रामाणे, हंबीर, मदने, चौकटे, मांढरे, मुंढे, कोंडे, कारकुड, काळे, भिंगारे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×