Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला गंडवले

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला गंडवले

४० हजारांची केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला गंडवले, चोरट्याने ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना २ जुलैला शंकशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाळकरी मुलीचा विनयभंग, क्रीडा शिक्षक अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक नाना पेठेत राहायला आहेत. ते बुधवारी (२ जुलै) शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बँकेच्या एटीएमध्ये दुपारी गेले होते. एटीएममध्ये एक चोरटा त्यांच्या पाठोपाठ शिरला. पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाकडे मदतीचा बहाणा केला. त्यांच्याकडून डेबीट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. ज्येष्ठाच्या डेबीट कार्डचा वापर न करता. चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड वापरले. पैसे न बाहेर पडल्याने चोरट्याने तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड ज्येष्ठ नागरिकाला दिले. पैसे न मिळाल्याने ते घरी गेले.

काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून ४० हजारांची रोकड लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले. चोरट्याने ज्येष्ठाच्या डेबीट कार्डचा वापर करुन खात्यातून पैसे लांबविल्याचे आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करत आहेत.

शहर परिसरात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. वारजे, रास्ता पेठ, खडकी भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना घडली हाेती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन उत्तर प्रदेशातील चोरट्यांना अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×