Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड, नांदेड सिटी, बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमान्यनगरमध्ये घरफोडी; १२ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाकडे गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी पाच लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. १९जून रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाव संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गॅस देयक थकीत असून, देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख ४२ हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

नांदेड सिटीत राहणाऱ्या एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चार लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेे. सायबर चोरट्यांनी त्यांना बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी करुन त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वर्ग केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

बाणेर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एपीके फाईल पाठवून पाच लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. सायब चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावरुन एक एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी खात्यातून पैसे काढून घेतले. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×