Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी ( दि.१७) सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचे निधन – सविस्तर बातमी 

इतिहासाच्या संशोधन कार्याला गेली ५० वर्षे त्यांनी वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते. त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता.

त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×