मावशी चोऱ्या वाढल्या आहेत, दागिने काढून रुमालात ठेवण्याची केली बतावणी अन जेष्ठ महिलेला लुटले
Marathinews24.com
पुणे– पीएमपीएल बसमधून खाली उतरल्यानंतर रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेला गाठून, दोघा चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले..आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या आहेत. तुमच्या गळ्यातील दागिने काढून आमच्याकडे द्या. आम्ही ते व्यवस्थित बांधून तुमच्याकडे देतो असे म्हणत चोरट्याने महिलेकडील २५ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना स्वारगेट परिसरातील सेवन लवचौकात घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर परिसरात राहायला असून, २६ मार्चला दुपारी साडे बाराच्या सुमारास बसमधून खाली उतरल्या. सोनवणे हॉस्पीटल समोरील रस्त्यावरील कमानी जवळ पासुन ते सेवन लव चौकाजवळील हँडलुम दुकानाच्या पाठीमागे उंबराच्या झाडाजवळ जात असताना दोघा चोरट्यांनी त्यांना गाठले. याठिकाणी चोऱ्या फार वाढल्या आहेत. तुम्ही तुमच्या कानातील टॉप व वेल काढुन ते दागीने रुमालामध्ये ठेवा, असे चोरट्यांनी सांगितले.
ते दागिने तुमच्याकडे असलेल्या पिशवीत ठेवतो म्हटल्यावर महिलेने विश्वासाने दागिने काढून दिले. चोरट्यांनी तो रुमाल पिशवीत ठेवला. त्यानंतर ते निघूण गेले. १५ ते २० मिनीटांनी महिलेला शंका आल्याने त्यांनी पिशवी उघडली. त्यावेळी त्यांना २५ हजार रुपये किंमतीचे दागिने मिळुन आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत बोराडे तपास करीत आहेत.