Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची अपेक्षा

marathinews24.com

पुणे – गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

सुनियोजित पुनर्विकासासाठी एकात्मिक विकास गरजेचा, लोकमान्य नगर रहिवासी संघाची ठाम भूमिका – सविस्तर बातमी

हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देऊन संस्थेतील चालू संशोधन, लसनिर्मिती प्रक्रिया आणि भविष्यातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि गर्भाशयमुख कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या उपक्रमाविषयी माहिती घेतली.

आबिटकर म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच जनजागृती, वेळेत निदान आणि उपचार हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. राज्यात महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि तपासणी मोहिमा आयोजित करणे अत्यावश्यक असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.

डॉ. पूनावाला म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोग हे महिलांमध्ये आढळणारे प्रमुख आरोग्य आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ‘एचपीव्हीलस विकसित करण्याचे काम करत आहे.

आबिटकर सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान संस्थेचे संशोधन विभाग, लसनिर्मिती युनिट आणि प्रयोगशाळा यांचीही यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. सायरस पूनावाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×