Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील शिवराज मोटेगावकर यांची चौकशी

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘आरसीसी क्लासेस’ संचालक शिवराज मोटेगावकरांची सीबीआयकडून चौकशी

marathinews24.com

पुणे – देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ या शिकवणी वर्गाचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून रविवारी चौकशी करण्यात आली. मोटेगावकर यांची पुण्यातील कार्यालयात चौकशी करण्यात आली.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडी – सविस्तर बातमी

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये ‘आरसीसी क्लासेस’चे कार्यालय आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी छापे टाकले. तेथे शोधमोहीम राबविली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार मोटेगावकर यांची चौकशी करण्यात अली. अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अटक करण्यात आली. दिल्लीतील विशेष न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मनीषा मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्यूटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली.

या प्रकणात मुख्य सूत्रधार लातूरमधील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यालाही अटक करण्यात आली. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित असल्याचे तपासात उघडकीस आले हाेते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×