पुण्यात शरद पवार व अजित पवार यांची बैठक
Marathinews24.com
पुणे – शहरातील साखर आयुक्त कार्यालयात कृषी क्षेत्रात एआय वापराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी अजित पवार हे शरद पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मिटींगला चलायच का ? असे म्हणाले. त्यानंतर लगेचच शरद पवार हे उठून दोघेजण एकत्रित बैठकीला मार्गस्थ झाले.
अभिजीत बिचुकले पुणे पोलिसांच्या तावडीत – सविस्तर बातमी
बैठकीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित आहेत. एआयच्या बैठकीला शरद पवार हे सकाळी 8 वाजुम 40 मिनिटांनी आले. तर त्यानंतर 10 मिनिटानी अजित पवार आले होते .त्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्या केबिन गेले आणि म्हणाले मिटींग ला चलायच का ? त्यानंतर दोघेजण एकत्रित बैठकीला गेले. तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले राहिले आहे.