सिंहगड रस्त्यावर घरफोडीची घटना
marathinews24.com
पुणे – बंद फ्लॅटचे सदनिकेचे तोडून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत शुक्लेंदु वसंत नामजोशी (वय ३२, रा. सुयोग अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामजोशी यांचा फ्लॅट बंद होती. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.