Breking News
पोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबितकामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिकारांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवरउद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारनवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटपलोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापरचऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणारआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठक

चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर

चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा भोंगळ कारभार

marathinews24.com

पिंपरी – भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ऍथलेटिक ट्रॅक उखडू नये म्हणून चक्क त्यावर स्टेपलर पिना मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पिनांमुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या लॉन्सचीही दुरवस्था झाल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार – सविस्तर बातमी 

संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात शहरातील एकमेव ऍथलेटिक ट्रॅक आहे. २०१९ मध्ये कोरोना काळात दोन वर्षे बंद असलेला हा ऍथलेटिक ट्रॅक कोरोनानंतर सुमारे नऊ महिने सुरू राहिला. त्यानंतर मार्च २०२३ पासून नूतनीकरणासाठी बंद केलेला ट्रॅक मार्च २०२४ रोजी सुरू करण्यात आला. जेमतेम महिनाभर खुला राहिलेला हा ट्रॅक निकृष्ट कामामुळे पुन्हा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२४ रोजी ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात झाली. ट्रॅकचे काम महापालिकेने पूर्ण केले. मात्र डी सेक्शनचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२५ ला हा ट्रॅक पुन्हा बंद करण्यात आला होता. तो एप्रिलमध्ये सुरू करण्यात आला आहे.

आता दुरुस्तीनंतर सुरू करण्यात आलेला हा ऍथलेटिक ट्रॅक उखडण्याचा प्रकार वारंवार होत असल्याने ठेकेदाराद्वारे हा ट्रॅक उखडू नये म्हणून त्यावर स्टेपलर पिना मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काही पिना ट्रॅकवर आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅकवर पिना मारण्याचा प्रकार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.

आतापर्यंत चार कोटींचा खर्च

संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ऍथलेटिक ट्रॅक, टेनिस कोर्ट, लॉन्स आणि दुरुस्तींवर महापालिकेने सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र ट्रॅक उभारल्यानंतर तो वारंवार उखडत आहे. त्याचप्रमाणे येथे उभारण्यात आलेले लॉन्स गायब झाले असून जागोजागी जंगली गवत उगवले आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे साध्या साध्या कारणांसाठी ट्रॅक महापालिकेद्वारे वारंवार बंद करण्यात येत असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त होत आहे.

यासंदर्भात महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले, भोसरीतील इंद्रायणीनगर येथील ऍथलेटिक ट्रॅकवर पिना मारल्याच्या प्रकाराची व लॉन्सची दुरवस्थाही पाहणी करण्यात येईल. संबंधित ठेकेदाराचे २५ लाख रुपये महापालिकेकडून अद्याप देणे बाकी आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल.

महापालिकेच्या या कारभाराबाबत एक ऍथलेटिक प्रशिक्षक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, स्पर्धेनंतर अथवा धावण्यानंतर खेळाडू स्पाईक बूट काढून अनवाणी पायाने ट्रॅकवरून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या पायाला पिनांमुळे गंभीर दुखापत होऊ शकते. त्याचप्रमाणे पिना स्पाईक बुटांच्या खिळ्यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. या ट्रॅकवरील पिना बाहेर येऊनही खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top