Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे पिंपरी-चिंचवड येथे आयोजन

राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे पिंपरी-चिंचवड येथे आयोजन

 जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – या वर्षीच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवात अधिकाधिक युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

कलांमधून मिळते जीवन जगण्याची उमेद- डॉ. संगीता बर्वे – सविस्तर बातमी 

युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे या उद्देशाने दरवर्षी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी जिल्ह्याला मिळाली आहे.

या महोत्सवात महाराष्ट्रातून पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई विभागांतील सुमारे ५०० युवक-युवती (वयोगट १५ ते २९ वर्षे) सहभागी होणार आहेत. महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधील विजयी संघास १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय, युवकांना त्यांचे अभिनव विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, सामाजिक विकासासाठी विज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि नवसंशोधकांचा समुदाय घडवणे ही या प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या पथकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असून ही स्पर्धा केवळ राज्यस्तरापर्यंत मर्यादित राहणार आहे, असेही श्री. लकडे यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×