Breking News
फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूकराँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभडेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटकबालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणारशासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूकपुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटलीअल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटनावाहतूक नियमन करा, कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवाहिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

स्वरूप वाघमारे यांना महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान

स्वरूप वाघमारे यांना महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्वरूप वाघमारे यांचा राष्ट्रीय सन्मान

marathinews24.com

पुणे – शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समर्पित आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी येथील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका स्वरूप ए. वाघमारे यांना नुकताच ‘महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार २०२६-२७’ प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त १६ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

‘सूर्यदत्त’तर्फे ११ वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’ प्रदान – सविस्तर बातमी 

नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी देशभरातून १७८ नामांकने प्राप्त झाली होती. त्यापैकी शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाच्या आधारे ७५ मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये स्वरूप वाघमारे यांचा समावेश आहे.

या पुरस्कार सोहळ्यास डॉ. कविता साळुंके, श्री. विशाल गावीत, डॉ. चुतर पी. सावंत, श्री. गोरख देवरे, डॉ. राकेश अशोक रामराजे आणि सारांश शेड भावसार हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

ज्ञानाचा प्रसार, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखल घेत स्वरूप वाघमारे यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना स्वरूप वाघमारे म्हणाल्या, “हा सन्मान माझे पहिले गुरु असलेले माझे वडील श्री. अशोक वाघमारे, माझे शिक्षक व मार्गदर्शक, माझे विद्यार्थी, सहकारी आणि माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कठीण व यशस्वी क्षणी मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे. हा पुरस्कार मी अत्यंत नम्रपणे स्वीकारते.”

स्वरूप वाघमारे यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य पुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×