तडीपार गुंडाला पाठलाग करत पोलिसांनी पकडले
Marathinews24.com
पुणे- पोलिस आल्याची चाहुल लागताच पळून जाणार्या तडीपार गुंडाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संघर्ष नितीन अडसूळ (वय २२ रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंडणी एकचे गुन्हे शाखा पोलिस अधिकारी व अंमलदार गस्त घालत होते.
पोलीस अंमलदार मयूर भोकरे व पोलीस हवलदार रणजीत फडतरे यांना तडीपारीतील आरोपी शहरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेत असताना तो पोलिसांना पाहुन पळून जात होता. त्यावेळी त्याला दोघांनी पकडून चौकशी केली असता, तो बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केली. ही कारवाई खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.