Breking News
रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडीखेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणेराज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाहीपुण्यात पालखी सोहळ्यावेळी ५ लाख वारकरी मुक्कामीअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचलारिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघातट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठारपालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविलेमाजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरणवारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखल

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्ह्यातील अपघाताच्या ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट) व्यापक स्वरुपात जनजागृती करावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश 

marathinews24.com

पुणे – रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; जिल्ह्यातील अपघाताच्या ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट) व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

शासकीय तांत्रिक विद्यालयात द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश सुरू – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

डूडी म्हणाले, पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका हद्दीत 15, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 22, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 2, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 1 आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत 2 असे एकूण 42 ब्लॅकस्पॉट आहेत, रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध, दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या 1 महिन्यात अहवाल सादर करावा.

मागील एका वर्षात जिल्ह्यात झालेल्या अपघाताची ठिकाणनिहाय कारणे शोधावीत. याअनुषंगाने सर्व संबंधित विभागाला सुरक्षात्मक उपाययोजना सूचना कराव्यात, याचे पालन सर्व संबधितांनी करावे. परिणामी जिल्ह्यातील इतर ठिकाणी याचा उपयोग होईल. खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. रस्ते सुरक्षा जनजागृतीकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही डूडी म्हणाले.

यावेळी  बहीर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामाबाबत माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top