Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत…

शिवसेना भवनात साकारला अनोखा देखावा

marathinews24.com

पुणे – शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनोखा, प्रेरणादायी व अंगावर रोमांच उभे करणारा देखावा साकारण्यात आला आहे. “संकटातून सुटका महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत” या शीर्षकाचा हा देखावा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित असून, त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचे आणि महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी तत्कालीन केलेल्या प्रयत्नांचे वास्तव दर्शन घडवतो.

रंगकाम करताना तोल गेला, १४ व्या मजल्यावरून पडल्याने मजूर ठार – सविस्तर बातमी

पहलगाम येथील दहशतवादी घटनेत पुण्यातील दोन पर्यटकांनी दुर्दैवाने आपले प्राण गमावले होते, तर शेकडो पर्यटक निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत जम्मू- काश्मीरमध्ये अडकले होते. अशा बिकट प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संकटस्थळी धाव घेत, थेट पहलगाम येथे जाऊन युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली. त्या घटनेतून महाराष्ट्राला हा स्पष्ट संदेश मिळाला की नागरिक कोणत्याही संकटात सापडल्यास एकनाथ शिंदे हे नेहमीच संकटमोचक देवदूताप्रमाणे मदतीला धावून येतात.

अनोख्या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, संपूर्ण प्रसंगाचे हुबेहूब चित्रण, सुबक कलाकृती आणि तितक्याच देखण्या सजावटींमुळे वातावरण भारावून गेले आहे.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले, शिवसेना भवनात सातत्याने वास्तवदर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी देखावे उभारण्याची परंपरा आहे. यापूर्वी‘इरसाळवाडीचा विघ्नहर्ता’ व ‘पुणेकरांचा पाठीराखा’ देखाव्यांनी पुणेकरांना भावनिक स्पर्श केला होता. यंदा पहलगाम येथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना वाचवण्यासाठी धाडसाने पुढाकार घेणारे खरे देवदूत म्हणून एकनाथ शिंदे यांचा पराक्रम उलगडणारा हा देखावा साकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना संकट काळात दिलासा देणारे, धैर्याने मार्ग काढणारे ते खरे संकटमोचक आहेत.”

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी देखील या देखाव्याला विशेष भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाने साकारलेल्या या संकल्पनेचे आणि कलाकृतींचे मनापासून कौतुक केले,शिवसेना भवनातील हा देखावा केवळ कलात्मकतेचा नमुना नसून, महाराष्ट्राच्या संकट काळातील नेतृत्व, धैर्य आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी यांचे जिवंत स्मरण आहे. पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरणारा हा देखावा गणेशोत्सवात खास आकर्षणाचा विषय ठरत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×