फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील गणेश पेठेतील सराफ दुकानात काम करणाऱ्या कारागिरानेच विश्वासघात करत १७ किलो चांदीचे दागिने चोरून पळ काढल्याची धक्कादायक घटना गणेश पेठेतील ‘साहद गोल्ड स्मिथ’ या त्यांच्या दुकानात २५ मार्च ते २६ मार्चदरम्यान ही घटना घडली आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४० लाख ८० हजार रुपये आहे. याप्रकरणी सैफुद्दीन अमीनुद्दीन मुन्शी (वय ३२, रा. मोमिनपुरा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मोटारीच्या धडकेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानात काम करणारा कारागीर लालन अफजल मंडल (रा. पश्चिम बंगाल) यानेच ही चोरी केली आहे. मंडल याने दुकानातील कामासाठी वापरल्या जाणाऱ्या काउंटरमधील लाकडी ड्रॉवर कशाच्या तरी सहाय्याने उघडले. तसेच इतर कारागिरांच्या ड्रॉवरमधील चांदीचे दागिनेही काढून घेतले. एकूण १७ किलो वजनाचे चांदीचे दागिने घेऊन आरोपी पसार झाला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने पोलिसांत धाव घेतली.याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. दुकानातील कामगाराकडूनच चोरी झाल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.























