Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

कुत्रा मागे धावला अन इलेक्ट्रेशनने जीव गमवाला

कुत्रा मालकावर गुन्हा, कसबा पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती कसबा पेठेत अतिशय धक्कादायक घटना घडली असून, कुत्रा मालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका तरूण इलेक्ट्रेशियनचा जीव गेला आहे. वीजेच्या कामासाठी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गेलेल्या इलेक्ट्रेशियनला पाळीव कुत्र्याने पाठलाग केला. त्यामुळे घाबरून पळाल्यानंतर इमारतीच्या डक्टमध्ये पडून गंभीररित्या जखमी झालेल्या इलेक्ट्रेशियनचा मृत्यू झाला आहे. संबंधित कुत्रा मालकाविरूद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ ऑक्टोबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास कसबा पेठेतील सिद्धीविनायक सोसायटीत घडली आहे.

बसच्या धडकेत पादचारी तरुण ठार – सविस्तर बातमी

रमेश रघुनाथ गायकवाड (वय ४५, रा. मंगळवार पेठ) असे ठार झालेल्या इलेक्ट्रेशियनचे नाव आहे. याप्रकरणी कुत्रा मालक सिद्धार्थ कांबळे (रा. कसबा पेठ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश गायकवाड (वय ४०) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड आणि त्यांचा मित्र गजानन घोडे हे १ ऑक्टोबरला कसबा पेठेतील सिद्धीविनायक इमारतीत इलेक्ट्रेशियनचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिसर्‍या मजल्यावर असताना चौथ्या मजल्यावर राहणारा सिद्धार्थ कांबळे याचा पाळीव श्वान खाली आला. श्वानाने भुंकत रमेशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. घाबरल्यामुळे रमेशने जिन्यातून खाली पळून जाण्यास प्राधान्य दिले. त्यावेळी तिसर्‍या मजल्यावरील डक्टमधून खाली पडल्यामुळे रमेश गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×