२६ हजार रुपयांचे दागिने गायब
marathinews24.com
पुणे – सलूनमध्ये काम करणार्या २४ वर्षीय महिला कर्मचार्याच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्याची घटना बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी अंजली राज जोगदंड यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केला आहे. ही घटना ९ एप्रिलला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली काही दिवसांपासून सलून ओपल कंपनीच्या ‘कपिल क्लासिक’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. ९ एप्रिलला ती ड्युटीवर आली तेव्हा तिने तिच्या हातातून ३ ग्रॅम १७० मिलीग्राम, २ ग्रॅम २७० मिलीग्राम आणि १ ग्रॅम ९४० मिलीग्राम वजनाच्या तीन अंगठ्या काढून बॅगेत ठेवल्या होत्या.
नोकरदारांनीच चोरले टॅब, सीपीयू अन कॅम्प्युटर – सविस्तर बातमी
संबंधित बॅग चेंजिंग रूममध्ये ठेवली असता, दिवसभर काम संपवून घरी जाण्यासाठी अंजलीने तयारी केली. त्यावेळी तिला बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या गायब असल्याचे दिसून आले. तिने सलूनमधील व्यवस्थापक हंसिता राजू सत्यनारायण, नेहा राहुल रसगर आणि पीयूष नकुम यांच्यासह इतर कर्मचार्यांकडे चौकशी केली, परंतु कोणीही दागिन्यांबद्दल माहिती दिली नाही. चोरीचा संशय अज्ञात व्यक्तीवर असून, ं संबंधिताने गुपचूप बॅग उघडून दागिन्यांची चोरी केली.