Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

आळंदी मंदिरात एकादशी दिनी भाविकांची गर्दी; पुष्प सजावट लक्षवेधी

आळंदी मंदिरात एकादशी दिनी भाविकांची गर्दी; पुष्प सजावट लक्षवेधी

एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती

marathinews24.com

आळंदी – एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील केली होती.

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -सविस्तर बातमी 

एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती तसेच हजेरी मारुती मंदिरात श्रींची आरती, हनुमान चालीसा,पसायदान हरिनाम गजरात झाले. आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, कीर्तन सेवा, हरीजागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर तसेच इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची गर्दी होती. अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी नदीत स्नान करून येथील तीर्थक्षेत्रीचे स्थान महात्म्य जोपासले. भाविकांनी इंद्रायणीचे पाण्याने आचमन करीत दर्शनास गर्दी केली.

आळंदी मंदिरात एकादशी दिनी भाविकांची गर्दी; पुष्प सजावट लक्षवेधी

वारकरी, भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस विभागाने दक्षता घेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीला अडथळा झाला. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत करून रहदारीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत परिश्रम घेतले. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी कायदा, शांतता सुव्यवस्थेसाठी काम पाहिले.

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, शैला तापकीर, उषा नरके, जयश्री टकले, सुवर्णा काळे, मेघा काळे, कौशल्या देवरे, सुरेखा काळभोर, शारदा गायत्रीडक, उषाबाई मुठाळ, ज्योती सोळंके, उषाबाई पाटील, शोभा उबाळे, सुरेखा कुऱ्हाडे, द्वारकाबाई घोंगडे, राधिका सोळंके, अमिता शिंदे, रेणुका पांचाळ, माधुरी मावळे, गंगा पारवे, लीला सुर्वे, संयोजक अर्जुन मेदनकर, माऊली घुंडरे, रोहिदास कदम, राजेश नागरे, गोविंद ठाकूर तौर आदींसह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top