सराफानेच केली चोरी; सोनाराला अटक, ४ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त
Marathinews24.com
पुणे – सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या सराफाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. २२ मार्चला वारजे माळवाडी गावठाणातील अष्टविनायक चौकात असलेल्या इमारतीतून चोरी झाली होती ४ लाख ५७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सराफा व्यावसायिकानेच चोरी केल्याचे उघडकीस आले. संपूर्णानंद परमानंद वर्मा
( वय ४३, रा. बालाजी बिल्डिंग, नेहरूनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव असून, त्याने त्याच्या पत्नीसह चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड आले.
आरोपीकडून रोख रक्कम २ लाख, १७ हजारांची २५० ग्रॅम चांदीची लगड, २ लाख १० हजार रुपये किमतीची ६७ ग्रॅम सोन्याची लगड असा एकूण ४ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन संबंधित मुद्देमाल हा फिर्यादीला परत करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली.
रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोर पसार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्समध्ये चोरीची तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तपास पथकाचे उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले. पथकातील अंमलदारांनी गोपनीय बातमीदारामार्फत तसेच उत्तमनगर, वारजे, नळस्टॉप, निगडी, भोसरी, पिंपरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी पोलिस अंमलदार अमित शेलार यांच्या माहिती वरून उपनिरीक्षक नरळे व पथकाने अतुलनगर, वारजे याठिकाणी छापा टाकून आरोपी वर्माला ताब्यात घेतले. वर्मा हा स्वत:च सराफा व्यापारी असून त्याने त्याच्या पत्नीसह चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची चार दिवस पोलिस कोठडीत
रवानगी केली आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक काईंगडे, निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार अर्जुन पवार, संजीव कळंबे, अमित शेलार, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखिल तांगडे, गोविंद कपाटे, अमित जाधव, योगेश वाघ, ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.