Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

‘तेजस्वी’मधून शनिवारी (ता. २८) उलगडणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्फूर्तिदायी गाथा

'तेजस्वी'मधून शनिवारी (ता. २८) उलगडणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्फूर्तिदायी गाथा

वंचित विकास संस्थेतर्फे आयोजन; दुर्मिळ छायाचित्रे, गीतांतून दृकश्राव्य अनुभूती

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अष्टपैलू जीवनाची स्फूर्तिदायक गाथा उलगडणाऱ्या ‘तेजस्वी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वंचित विकास संस्थेतर्फे येत्या शनिवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रे आणि गीतांमधून दृकश्राव्य अनुभूती पुणेकरांना घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली.

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभिषेक अवचार यांची नियुक्ती – सविस्तर बातमी 

“प्रखर राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, प्रतिभावान लेखक, संवेदनशील कवी, विद्वान व्याख्याते, उत्कृष्ट नाटककार, कठोर विज्ञाननिष्ठ, भाषाप्रेमी, समाजसुधारक, हिंदू संघटनासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवणारे कृतिशील हिंदुत्ववादी असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू या कार्यक्रमातून उलगडून दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना आणि लेखन सुधांशु नाईक यांनी केले असून, प्रसाद नातू, आरती परांजपे, चैत्राली अभ्यंकर आणि सुधांशु नाईक हे सादरीकरण, तर व्हायोलिनवर गोविंद कुलकर्णी साथसंगत करणार आहेत,” असे मीना कुर्लेकर यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×