Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभिषेक अवचार यांची नियुक्ती

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभिषेक अवचार यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या सचिवपदी अभिषेक वसंतराव अवचार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर राज्याचे नियोजन व अंमलबजावणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश अबनावे उपस्थित होते.

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी – सविस्तर बातमी 

पुण्यात वास्तव्यास असलेले अभिषेक अवचार सध्या युवक काँग्रेसच्या धोरण आणि संशोधन समितीचे राष्ट्रीय संयोजक आहेत. त्यांच्याकडे देशातील लोकसभा आणि विधानसभा क्षेत्राचे विश्लेषण करण्यासह विद्यापीठ स्तरावरील युवकांना काँग्रेसच्या धोरण व योजनांबाबत माहिती देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याअंतर्गत त्यांनी युवक काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर ‘हात से हात जोडो’ हे राष्ट्रीय जनसंवाद अभियान तयार करून देशात यशस्वीपणे राबवले.

या कार्याची दखल पक्षाने त्यांची महाराष्ट्र प्रदेशपदी सचिवपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राचे नियोजन व अंमलबजावणी या विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब, राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, राष्ट्रीय सचिव नवज्योत संधु व राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्लाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे. पक्षाची धोरणे व कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी अभिषेक अवचार सर्वोत्तम योगदान देतील, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×