छत्रपती औरंगजेब अलामगीर करण्याचा केला खोडसाळपणा
marathinews24.com
पुणे – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे नावारूपाला आलेल्या बालेवाडी म्हाळुंगेतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे गुगल लोकेशन मॅपवरील नाव बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल ऐवजी छत्रपती औरंगजेबआलमीर स्पोर्टस कॉम्प्लेक्स असे नामकरण गुगल लोकेशनवर केले आहे.यामुळे शिवप्रेमी, खेळाडु, ग्रामस्थ, स्थानिक नागरिक संतप्त झाले असून, संबंधित समाज कंटकांवर तातडीने कारवाईची मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलीस ठाण्यात केली आहे.
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी कायदा व सुव्यवस्था राखणे प्रथम कर्तव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठिकठिकाणी इच्छितस्थळी जाण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतला जातो. त्याठिकाणी जाण्यासाठी कोणता रस्ता आहे, किती लांब आहे, कोणत्या प्रकारच्या वाहनाने गेल्यास साधारण किती वेळ लागेल, याची माहिती गुगल मॅपवर शोधली जाते. याच गुगल मॅपवर जाऊन एका समाज कंटकाने लोकेशन एडीट केले आहे.
तंत्रज्ञानाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करुन अशा प्रकारे नाव बदलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे गुगल मॅपच्या एडीट पर्यायाचा वापर करुन इंटरनेटवरील हॅकर्स इतर ही अनेक असे गुन्हे करु शकतात.तरी त्याला वेळीच आळा घालावा. हे गुन्हे शक्यतो virtual private network वापरुन केले जातात. या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घ्यावा.
गुन्हेगारांना तातडीने शोधून कारवाई करावी, संबंधित गुगल लोकेशन मॅपवरील नाव लवकरात लवकर बदलण्याची मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे.