डेक्कन पोलिसांकडून गुन्हा
Marathinews24.com
पुणे – उपाहारगृहात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकानेच ऑनलाइनरित्या ३१ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापकाविरुद्ध डेक्कन पोलिसंनी गुन्हा दाखल केला. अमोल अर्जुन भुसाळे (रा. हर्षवर्धन काॅम्प्लेक्स, दगडे पाटीलनगर, शिवणे) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. उपाहारगृहाचे मालक विजय प्रभाकर आवटी (रा. करिश्मा सोसायटी, कोथरूड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सराफ व्यावसायिकानेच रचला दरोड्याचा बनाव, अन स्वतःचे ज्वेलर्स लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवटे यांचे एरंडवणे भागात उपाहारगृह असून, आरोपी अमोल भुसाळे त्यांच्या उपहारगृहात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. उपाहारगृहात येणाऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने जमा केलेली रक्कम त्याने मालक आवटी यांच्या खात्यावर जमा केली नाही. ही रक्कम त्याने ग्राहकांना स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने भुसाळेने स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ६२ हजार रुपये जमा करुन घेतले. ऑनलाइन जमा झालेल्या रकमेबाबत संशय आल्याने आवटी यांनी चौकशी केली. तेव्हा व्यवस्थापक भुसाळने अपहार केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.