Breking News
एसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्नडी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण' समितीची आढावा बैठक संपन्न

वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत – विभागीय आयुक्त

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील वाहतूक योजनांचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ; इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे – सविस्तर बातमी  

बैठकीला पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे मनपा अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियमन योग्यरितीने होण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा अभ्यास करावा. वाहतुकीचा प्रारंभ व दिशा याचा योग्य अभ्यास करून सर्वेक्षणानुसार प्रकल्पांचे सादरीकरण करावे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

यावेळी विश्रांतवाडी, मुंढवा चौक, मार्केट यार्ड ते सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान, घोरपडी ब्रीज, मगरपट्टा परिसरातील सार्वजनिक वाहतूक, कॉरिडॉर, डबल डेकर टनेल, पीएमपीएलच्या नवीन बसेस साठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन आदींबाबत चर्चा करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×