जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलांचे दागिने चोरण्याचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. स्वारगेट ते औंधगाव असा बसप्रवास करणार्या जेष्ठ महिलेला लक्ष्य करीत त्यांच्या हातातील ९२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना १२ मे रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास प्रवासात घडली आहे. याप्रकरणी कल्पना बाळू पवार (वय ६० रा. जुनी सांगवी, पुणे) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात सायबर चोरट्यांचा तरूणांना तडाखा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना पवार कुटूंबियासह जुनी सांगवी परिसरात राहायला असून, कामानिमित्त १२ मे रोजी स्वारगेटला आल्या होत्या. काम झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी कल्पना बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी कल्पनाच्या हातातील ९२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून उतरताना त्यांना हातात सोन्याची बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिर्के तपास करीत आहेत.