Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

कॅम्पमध्ये एसीच्या ताब्यांच्या तारांची चोरी

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुकानावरील टेरेसच्या एसींच्या ४५ हजार रूपये किंमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी केल्याची घटना १८ ते २० डिसेंबर कालावधीत कॅम्पमधील एमजी रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५६ वर्षीय दुकानदाराने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे कॅम्पमधील एमजी रस्त्यावर दुकान असून, १८ ते २० डिसेंबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या टेरेसवर प्रवेश मिळवला. त्यानंतर एसीच्या तांब्याच्या तारांची चोरी करून ४५ हजारांचा माल नेला. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अमलदार अनिल उपरे तपास करीत आहेत.

कर्वेनगरात ३ लाखांचा प्रिंटरहेड चोरीला

पुणे- प्रिटींग दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख रूपये किंमतीचा प्रिंटरहेड चोरून नेला आहे. ही घटना २१ ते २२ डिसेंबर कालावधीत वनदेवी चौकातील नवीन शिवणे कोथरूड ड्रीम कॅचर फ्लेक्स प्रिटींग दुकानात घडली आहे. याप्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणार्‍या तरूणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादाराचे वनदेवी चौकातील नवीन शिवणे कोथरूड ड्रीम कॅचर फ्लेक्स प्रिटींग दुकान आहे. २१ ते २२ डिसेंबर कालवधीत त्यांचे दुकान बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तब्बल ३ लाखांचा प्रिटींगहेड चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×