भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुकानातील गल्ल्यामध्ये असलेल्या १५ हजारांचा रोकडसह चोरट्यांनी तब्बल २ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ७ जुलैला कात्रजमधील ओसवाल ट्रेडींग कंपनीत घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय दुकानदाराने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटार चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण; एरंडवणे भागातील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगावमध्ये राहायला असून, ७ जुलैला दुकानातील १५ हजारांची रोकड आणि इतर ऐवज असा मिळून २ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळताच तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आण्णा दराडे तपास करीत आहेत. दरम्यान, शहरातील विविध भागातील दुकानांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांना अटकाव करण्याची मागणी केली जात आहे.
गाडी खरेदीनंतर अपहार करणार्याला बेड्या
खरेदीच्या बहाण्याने पीकअप टेम्पो ताब्यात घेउन रक्कम न देता अपहार करणार्या आरोपीला फरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २४ एप्रिलला हांडेवाडीत घडली होती. सोहेल शौकत शेख (वय ३०, शेख वस्ती, अन्ठरणे, बारामती ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मंतरवाडी चौकात राहायला असून, २४ एप्रिलला त्यांनी स्वतःचा पीकअप टेम्पो आरोपी सोहेल शेख याला साडेतीन लाखांना विकला होता. मात्र, त्याने व्यवहाराची रक्कम न देता तक्रारदाराची फसवणूक केली. गाडी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे तपास करीत आहेत.
























