Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

दिवाळीनंतर पुण्यात चोरट्यांचा उच्छाद

फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात

ठिकठिकाणच्या घरफोडीत १८ लाखांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – दिवाळीनंतर शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी १८ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. उपनगरातील उंड्री, कात्रजमधील सुखसागरनगर, फुरसुंगी, तसेच नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

बहिणीला ‘व्हिडीओ काॅल’ करुन तरुणाने घेतला गळफास – सविस्तर बातमी

कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंड्री परिसरात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे उंड्रीतील आबनावे बिल्डींगमध्ये राहायला आहेत. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) चोरट्यांनी दुपारी चारच्या सुमारास सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

कात्रजमधील सुखसागरनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ लाख ९८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे अंबामाता मंदिराजवळ असलेल्या गुरुदत्त व्हिला सोसयाटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटातून दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करत आहेत. नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ३६ हजारांचे चार मोबाइल लांबविल्याची घटना घडली. पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×