Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन गुंड तडीपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन गुंड तडीपार

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कात्रज भागातील तीन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २०, रा. सिद्धीविनायक कॉलनी, आंबेगाव खुर्द), विनोद दिलीप धरतीमगर (वय २२, रा. आंबेगाव बुद्रुक), प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (वय २१, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती – सविस्तर बातमी 

निसर्गंध, धरतीमगर, कुडले यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ आणि आंबेगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तिघांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला माेहिते यांनी मंजुरी देऊन तिघांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×