Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

विश्रांतवाडी, पुणे-सोलापूर रस्ता, सासवड रस्त्यावर अपघात

marathinews24.com

पुणे -शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विश्रांतवाडी, पुणे-सोलापूर रस्ता, तसेच सासवड रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. दरम्यान, गंभीर स्वरुपांच्या अपघातांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात शहरात वेगवेगळ्या अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी भागात आळंदी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सलीम शेख (वय १९, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सलीम शेख याचा मो’ा भाऊ अकबर (वय ४५) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साईबाबा पालखी सोहळ्यात ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम १८ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आळंदी रस्त्याने निघाला होता. त्यावेळी रस्ता ओलांडणार्‍या सलीम याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सलीमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष शेषराव जाधव (वय ३०, सध्या रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार दिनकर दगडू जाधव (वय २८, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) जखमी झाला आहे. जाधवने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी ट्रकचालक सागर शरणप्पा ऐहोळे (वय २५, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दिनकर आणि त्याचा मित्र संतोष हे मूळगावी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी परिसरात सोमवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी संतोष गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार दिनकर याला दुखापत झाली. संतोष याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

हडपसर – सासवड रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी रिक्षाचालक मारुती सहदेव नवघणे (वय ४० रा. बेदवाडी, फुरसुंगी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रवीण पोटे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २५ जून रोजी पादचारी हडपसर-सासवड रस्त्यावरुन निघाला होता. फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात भरधाव रिक्षाने रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला धडक दिली. अपघातात डोक्याताल गंभीर दुखापत झाल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याची ओळख पटलेली नाही. पादचार्‍याचे वय अंदाजे ५० वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top