Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

मगरपट्टा, अहिल्यानगर रस्ता, तसेच खराडी भागात अपघाताच्या घडल्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसरमधील मगरपट्टा, अहिल्यानगर रस्ता, तसेच खराडी भागात अपघाताच्या घटना घडल्या.

हातउसने पैशांच्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

खराडी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (७ मे) सायंकाळी घडली. संगीता पांडुरंग कारभारी-पाटील (वय ३९, रा. निर्मल टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगीता यांचे पती पांडुरंग (वय ४३) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार संगीता या खराडी परिसरातून गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी भरघाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे तपास करत आहेत.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर लोणीकंद भागात ट्रकच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (८ मे) सायंकाळी घडली. शांताबाई रघुनाथ जाधव (वय ७२) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जाधव यांचे भाऊ किसन हनुमंता देवकर (वय ७७, रा. वरुड,ता. जिंती, जि. परभणी ) यांनी लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर यांची पत्नी आणि बहीण शांताबाई या शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अहिल्यानगर रस्त्याने निघाल्या होत्या. लोणीकंद भागात रस्ता ओलांडताना शांताबाई यांना ट्रकने धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

हडपसर भागात तरुणाचा मृत्यू

हडपसरमधील मगरपट्टा भागात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. जिशान अफसर शेख (वय १९, रा. सादाफ टाॅवर, लष्कर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत शेख अफसर बशीर मियाँ (वय ५४, रा. चिंचगव्हाण, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी दुचाकीस्वार जिशान हा रात्री साडेदहाच्या सुमारास मगरपट्टा परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. दुचाकीस्वार जिशान फेकला गेला. समाेरून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×