Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने ४ व ५ सप्टेंबर रोजी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले आहे.

पुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित – सविस्तर बातमी

फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातील वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवरकर रोडवरही ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात येणार असून, संविधान चौक, साळुंखे विहार रोड, फ्लॉवर व्हॅली लेन आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार विविध मार्गांवर वाहतुकीचे नियमन व मार्गबदल करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, काही मार्ग पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दहीहंडी उत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×