Breking News
Kharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

वारकऱ्यांसह पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने संताच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून, ९ ते ११ जुलै कालावधीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने अवजड वाहनांना बंदी करून पालखी मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी वाहतूक पोलिसांसह वारकर्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त पोलीस दल सज्ज, ७ हजारांचा बंदोबस्त – सविस्तर बातमी

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन

श्री. क्षेत्र आळंदी देवाची येथुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ९ Branch वडमुखवाडी, चर्‍होली फाटा, दिघी मॅगझीन, म्हस्के वस्ती कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, साप्रस चौकी, चंद्रमा चौक, संगमवाडी रोडने पाटील इस्टेट चौकातून इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे ९ जुलैला पहाटे तीन वाजेपासून खालील रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. कळस फाटा ते बोपखेल फाटा / विश्रांतवाडी चौक-मेंटल हॉस्पीटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन -सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड – चंद्रमा चौक ते आळंदी रोड -नविन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर ब्रीज ते चंद्रमा चौक व साप्रस चौकी रस्ता बंद ठेवला जाणार आहे. सादलबाबा दर्गा चौक, येरवडा ते पाटील इस्टेट दरम्यानच्या कालावधीमध्ये रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

दोन्ही पालख्यांचे एकत्रित मार्ग

पुणे-मुंबई रोडने इंजिनियरींग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रोडने विजय टॉकीज चौक, सदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोडया विठोबा मंदीर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, मारुती चौक, नानापेठ पोलीस चौकीजवळ आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौक मार्गे निवडुंगा विठोबा मंदीर येथे जावून मुक्काम करणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौक मार्गे पालखी विठोबा मंदीरात मुक्कामी असणार आहे .

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंदीर, नाना पेठ आणि पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, पुणे येथे मुक्कामाला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार रस्ते वाहतूकीसाठी बंद केले जाणार आहेत. तसेच रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेश खिंड रोड )- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)-गाडगीळ पुतळा ते स. गो बर्वे (शिवाजी रोड)-चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग – डेक्कन वाहतूक विभाग ते मॉर्डन कॉलेज रस्ता कुंभारवेस चौक- शाहीर अमर शेख चौक वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी (बंद रस्ते)

संत श्री. तुकाराम महाराज पालखी ८ जुलैला विठ्ठल मंदिर आकुर्डी मुक्कामी असून, ९ जुलैला निघुन चिंचवड- पिंपरी वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरीस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक मार्गाने पुण्यात येणार आहे. त्यामुळे ९ जुलैला रात्री दोन वाजेपासून वाहतूकीसाठी रस्ते बंद ठेवले जाणार आहेत.

तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (बंद रस्ते)

फर्ग्युसन रोड ते टिळक रोड, डेक्कन ते कोथरूड- वारजे-सिंहगड रोड, लक्ष्मी रोड ते बेलबाग चौक ते टिळक चौक, शिवाजी रोड ते गाडीगीळ पुतळा-जिजामाता चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक, शनिपार ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारूती चौक हे रस्ते ९ जुलैला दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.

पुण्यात पालखी मुक्कामी वाहतूकीचे इतर निर्बंध

निवडूंग्या विठोबा मंदीर आणि पालखी विठोबा मंदीर परिसरात् ९ ते ११ जुलै सकाळी अकरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्कंग करण्यास मनाई आहे. परिसरातील वाहतूक भाविकांच्या गर्दीनुसार आवश्यकतेप्रमाणे वळविण्यात येणार आहे. वाहतूकीची कोंडी होवू नये यासाठी सर्व नागरीकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल अंमलात आणून तसेच पोलीसांनी त्या-त्यावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

पालखी सोहळ्यातील वाहन चालकांसाठी सूचना

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वाहन चालकांनी पर्यायी रस्तांचा वापर करावा. ९ जुलैला आळंदीहून विश्रांतवाडीकडे येणार्‍या वाहनांनी मरकळ- तुळापूर-फुलगाव-लोणीकंद-वाघोली-लोहगाव-येरवडा परिसरातील रस्त्यांचा वापर करावा. तसेच ११ जुलैला पुण्याहून-सासवडच्या दिशेने जाताना वाहन चालकांनी भैरोबानाला-लुल्लानगर चौक- कोंढवा खडीमशीन चौक- बोपदेव घाट मार्गे सासवड मार्गाचा वापर करावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×