Breking News
शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्यसायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूककेरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूकबी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहनशिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनमुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचलापुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळलीकंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने साडेतीन कोटीचा गंडापुण्यात पीएमपीएल बसचालकाचा बेदरकपणा प्रवाशाच्या जीवावर

पुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळली

अवकाळी मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळली

marathinews24.com

पुणे– मुसळधार पावसामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा – सविस्तर बातमी 

शहरासह परिसरात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाच ठिकाणी झाडे कोसळली. शनिवार पेठ, उंड्री, लोहगाव, येरवडा, बिबवेवाडी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले आही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटविल्या. फांद्या हटविल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन दिली.

तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचले. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाला. वसाहतीत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, हडपसर रस्ता, नगर रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाला. मात्र, शहरात कोठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top